Chetan Zadpe
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे.
राम मंदिराच्या या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. यासाठी 11 दिवसांचा विधी सुरू केला आहे.
हजारो स्वयंसेवक व राम भक्तांच्या अयोध्येत राम मंदिर साकारण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
इतिहासाची पाने पालटून पाहिली की, तर सुमारे ३२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी दुपारी अयोध्येतील राम मंदिराच्या ठिकाणी पोहोचले होते.
एकतेचा संदेश देण्यासाठी नरेंद्र मोदी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एकता यात्रेवर होते.
नरेंद्र मोदी 32 वर्षापूर्वी अयोध्येला पोहोचले तेव्हा त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देत राम मंदिर बांधल्यानंतरच येथे परतणार असल्याची शपथ घेतली.
राम मंदिराची पायाभरणी त्यांच्या हस्ते कमळाच्या फुलांनी करण्यात आली. आता प्राणप्रतिष्ठेची प्रतीक्षा संपली असून, 22 जानेवारीला हा सोहळा पार पडत आहे.