Lala Lajpat Rai Jayanti : इंग्रजांच्या हल्ल्यात 'पंजाब केसरींचा' मृत्यू; भगत सिंगांनी 'असा' घेतला बदला!

Chetan Zadpe

पंजाब केसरी -

लाला लजपतराय यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान मोठे आहे. काँग्रेसच्या जहाल गटाचे ते नेते होते. म्हणून त्यांना 'पंजाब केसरी' असे म्हटले जाते.

Lala Lajpat Rai Jayanti | Sarkarnama

इंग्रजांनी केला लाठीचार्ज

30 ऑक्टोबर 1928 ला लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने सुरू होती. यात लाला लजपतरायही सहभागी झाले होते. यात ब्रिटीश सैनिकांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

Lala Lajpat Rai Jayanti | Sarkarnama

सायमन कमिशन काय होते?

8 नोव्हेंबर 1927 ला ब्रिटीशांनी घटनात्मक सुधारणांच्या चाचपणीसाठी आयोग स्थापन केला. यालाच सायमन कमिशन म्हणतात. यात सात ब्रिटिश खासदार होते, पण एकही भारतीय सदस्य नव्हता. माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांच्या चौकशीसाठी हा आयोग होता.

Lala Lajpat Rai Jayanti | Sarkarnama

विरोध प्रदर्शन -

सायमन कमिशन 3 फेब्रुवारी 1928 रोजी भारतात आले. काँग्रेससह संपूर्ण देशाने याला विरोध केला. सायमन कमिशन चले जाव, अशी घोषणाही करण्यात आले. पंजाबमधील या आंदोलनाचे नेतृत्व लाला लजपत राय करत होते.

Lala Lajpat Rai Jayanti | Sarkarnama

निधन -

लाहोर पोलिसांचे तत्कालीन अधिकारी 'जेम्स ए स्कॉट' याच्या आदेशाने आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आले. यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले. या नंतर 18 दिवस उपचारानंतर 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले.

Lala Lajpat Rai Jayanti | Sarkarnama

भगतसिंग यांनी घेतला बदला -

लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगत सिंग यांच्यासह क्रांतिकारकांनी जेम्स ए. स्कॉट याचा खून करण्याचा कट रचला. मात्र, यामध्ये चुकीच्या माहितीमुळे क्रांतीकारकांनी 17 डिसेंबर 1928 रोजी स्कॉटऐवजी जॉन पी. सॅन्डर्सला गोळ्या घातल्या.

Lala Lajpat Rai Jayanti | Sarkarnama

इंग्रजांना दिले उत्तर -

अशा प्रकारे क्रांतिकारकांनी इंग्रजांना संदेश दिला होता की, लाला लजपत राय यांच्या मृत्यूने आता देश गप्प बसणार नाही आणि इंग्रजांना जशास तसे उत्तर दिले जाईल.

Lala Lajpat Rai Jayanti | Sarkarnama

NEXT : मराठा आरक्षण अध्यादेशानंतर मुख्यमंत्री शिंदे ठाण्याच्या आनंदाश्रमात; पाहा खास फोटो!

क्लिक करा...