Chetan Zadpe
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जन्मदिनानिमित्त आज टेंभीनाका येथील आनंदआश्रमात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
आनंद दिघे यांच्या जन्मदिनीच मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून, मराठा समाजाला दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला, असे शिंदे म्हणाले.
आज आनंद दिघेंचे विचार अंगिकारून आपण मराठा समाजातील मागास, गरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
टेंभीनाका येथील चौकात असलेल्या दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण.
ठाण्यातील त्यांचे समाधीस्थान असलेल्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्र्यांनी आदरांजली अर्पण केली.
आजच्या दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने डीबीटी पोर्टलद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनेला 'धर्मवीर आनंद दिघे लाभ समर्पण योजना' असे नामकरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
ठाणे शहरातील 250 कार्यकर्त्यांना विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार मिलिंद देवरा, प्रवक्ते नरेश म्हस्के आदी नेते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.