Devendra Prasad Yadav : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लालूंना धक्का देणारे देवेंद्र प्रसाद यादव!

Mayur Ratnaparkhe

राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र प्रसाद यादव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

Devendra Prasad Yadav | Sarkarnama

 RJD वर गंभीर आरोप करत, देवेंद्र प्रसाद यादव यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Devendra Prasad Yadav | Sarkarnama

देवेंद्र प्रसाद यादव यांचा राजीनामा हा लालू प्रसाद यादवांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Devendra Prasad Yadav | Sarkarnama

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना तिकीट वाटपात गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Devendra Prasad Yadav | Sarkarnama

देवेंद्र प्रसाद यादव यांनी लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदाना सुरू होण्या अगोदरच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

Devendra Prasad Yadav | Sarkarnama

देवेंद्र प्रसाद यादव यांनी राजीनामा देताना, लालू प्रसाद यादव यांना एक पत्र पाठवले आहे. 

Devendra Prasad Yadav | Sarkarnama

'मी यापुढे राजदच्या धोरणाशी सहमत नसेल. राजद केवळ सत्ता गाजवण्यासाठीच धोरण अवलंबवत आहे.'

Devendra Prasad Yadav | Sarkarnama

झांझारपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सुमन महासेठ यांना महाआघाडीचे उमेदवार बनवण्याबाबत त्यांची मोठी नाराजी आहे.

Devendra Prasad Yadav | Sarkarnama

आपल्या कार्यकर्त्यांच्या जागी झांझारपूरमधून जातीयवादी विचारसरणीच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याच्या घटनेने आपण खूप दुखावलो असल्याचे यादव म्हणाले.

Devendra Prasad Yadav | Sarkarnama

Next : धाराशिवमध्ये बंडाच्या तयारीत असलेले कोण आहेत प्रा. रवींद्र गायकवाड