Deepak Kulkarni
पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानक हे मेट्रो स्टेशनच्या कामामुळे वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
पण आता पुण्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या शिवाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन ( महामेट्रो ) यांच्यामध्ये अत्याधुनिक बस पोर्ट उभारण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बसस्थानक विकासासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या बुधवारी (ता.4 नोव्हेंबर) करण्यात आल्या.
पुण्यातील नवीन प्रस्तावित शिवाजीनगर बसस्थानकासाठी तब्बल 825 कोटी रुपये खर्च येणार आहे.
हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक बस स्थानक ठरणार आहे.
या ठिकाणी एसटी बस, पुणे मेट्रो, रेल्वे, पीएमपीएमएल बस आणि रिक्षा अशा सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
विशेष म्हणजे हे 15400 चौरस मीटर जागे नवे बसस्थानक सुमारे 15400 चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे.
या बसस्थानकात रोज 1 लाखांपेक्षा अधिक प्रवाशी वावर करू शकणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यात बस पार्किंग आणि व्यावसायिक संकुल असणार आहे.