Rashmi Mane
रेशन कार्डधारकांना केवळ स्वस्त धान्यच नाही, तर विविध सरकारी योजनांचाही लाभ मिळू शकतो. तुमच्या कार्डवर नेमके कोणते फायदे मिळतात? जाणून घ्या.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पात्र कुटुंबांना रेशन दुकानातून गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात.
अंत्योदय अन्न योजनेतील पात्र कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्य मोफत मिळते.
प्राधान्य कुटुंब (PHH) कार्डधारकांना प्रत्येक पात्र सदस्यामागे दरमहा 5 किलो धान्य मिळते.
रेशन कार्डचा वापर विविध सरकारी योजनांमध्ये कुटुंबाची ओळख आणि पात्रता तपासण्यासाठी केला जातो.
रेशन कार्ड हे कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि पत्ता दर्शवणारे महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
राज्य सरकारच्या काही योजनांमध्ये पात्रतेनुसार रेशन कार्डचा उपयोग होतो. त्यामुळे कार्डवरील माहिती अद्ययावत ठेवा.
तुमचे रेशन कार्ड कोणत्या प्रकारचे आहे, हे तपासा. धान्याचे प्रमाण आणि इतर लाभांची माहिती महाराष्ट्राच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जाणून घ्या.