Mangesh Mahale
सरपंच संतोष देशमुख यांची 16 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या झाली होती. संतोष यांना न्याय मिळावा यासाठी भाऊ धनंजय देशमुख लढा देत आहेत.
लाडक्या भावाला कायमचे आपल्यासोबत ठेवण्यासाठी धनंजय देशमुख यांनी अनोखी कृती केली आहे.
धनंजय यांनी हे एक भावनिक पाऊल उचलले आहे.
सरपंच देशमुखांचा भाऊ धनंजय यांनी मानेवर संतोष देशमुख यांचा टॅटू काढला आहे.
धनंजय यांनी आपल्या मानेवर संतोष देशमुख यांचा काढलेल्या टॅटूमध्ये यात संतोष यांचा हसरा चेहरा आहे.
टॅटूमध्ये संतोष यांचा हसरा चेहरा असून त्याखाली 'सत्य-विरा-युद्ध' अशी अक्षरे कोरली आहेत. ही नावे त्यांच्या मुलांची आहेत
माझा भाऊ शरीराने गेला असला तरी तो माझ्या विचारात आणि श्वासात कायम जिवंत आहे," अशी भावना धनंजय यांनी व्यक्त केली.