सरकारनामा ब्यूरो
भाजपने अर्चना पाटील चाकूरकर यांना लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
अर्चना या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुष्ना असून लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अर्चना पाटील या महाराष्ट्रातील उदगीर येथील लाइफकेअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
अर्चना यांनी महाराष्ट्रातील मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली आहे.
मार्च 2005 पासून त्या ऊर्जा फाऊंडेशनबरोबर जोडलेल्या आहेत. तर गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रीय असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नारी शक्ती वंदन या कायद्यास प्रेरित होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
अर्चना या 2019 ला काँग्रेसच्या तिकीटावर लातूर शहरमधून विधानसभा लढवणार होत्या अशी चर्चा होती. मात्र कौटुंबीक कारणामुळे त्यांनी माघार घेतली.
अर्चना पाटील यांचे पती शैलेश पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे प्रदेश चिटणीस आहेत. त्यामुळे त्यांच्या उमदेवारीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
लातूर शहर मतदारसंघातून तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिलेले अमित देशमुखांविरोधात अर्चना पाटील चाकूरकर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
लातूर मतदरासंघात अनेक वर्षांपासून देशमुख कुटुंबाचं वर्चस्व आहे. 2024 च्या विधानसभेत हे चित्र बदलेल का? याबाबत उत्सुकता वाढली आहे.