Sudhakar Shringare : बांधकाम मजूर, व्यावसायिक, जिल्हा परिषद सदस्य ते खासदार...

Deepak Kulkarni

भाजपकडून सुधाकर श्रृंगारे यांना पुन्हा उमेदवारी

लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सुधाकर श्रृंगारे यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून कोण? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

Sudhakar Shringare | Sarkarnama

...तरी पक्षश्रेष्ठींची मात्र श्रृंगारे यांना पसंती

भाजपकडून लढण्यास अनेक इच्छुक असताना आणि पक्षश्रेष्ठींनी मात्र श्रृंगारे यांना पसंती दर्शवली.

Sudhakar Shringare | Sarkarnama

राजकीय पार्श्वभूमी नाही...

राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या घरात श्रृंगारे यांचा जन्म झाला.

Sudhakar Shringare | Sarkarnama

2019 ला लढवली पहिली लोकसभा निवडणूक

खासदार सुधाकर शृंगारे यांनी 2019 ची लोकसभा पहिल्यांदा लढवली. कुठलीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आर्थिक सुबत्ता आणि राजकीय नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध या जोरावर शृंगारे मैदानात उतरले. 

Sudhakar Shringare | Sarkarnama

पहिल्याच निवडणुकीत तब्बल मोठा विजय

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत असल्यामुळे सुधाकर शृंगारे यांचा तब्बल दोन लाख 89 हजार मतांनी विजय झाला.

Sudhakar Shringare | Sarkarnama

असा राजकीय प्रवास...

बांधकाम मजूर ते बांधकाम व्यावसायिक आणि जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा प्रवास सुधाकर श्रृंगारेंचा राहिला आहे.

Sudhakar Shringare | Sarkarnama

जनसंपर्क कमी...

खासदार शृंगारे यांचा मतदारसंघात जनसंपर्क नाही, स्थानिक नेत्यांसोबत केवळ कार्यक्रमस्थळी हजेरी लावण्याचे सोपस्कार ते पाडतात.

Sudhakar Shringare | Sarkarnama

एकदाही अंगात जॅकेट घातले नाही.

विजयी झाल्यानंतर त्यांनी एकदाही अंगात जॅकेट घातले नाही. मोलमजुरी करून आज बांधकाम व्यवसायात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावल्यानंतर शृंगारे विद्यार्थी, गरजूंना आर्थिक, शैक्षणिक व वैद्यकीय मदत करतात.

R

Sudhakar Shringare | Sarkarnama

NEXT : ईडीने अटक केलेल्या कोण आहेत के. कविता ?

येथे क्लिक करा...