Mangesh Mahale
RCC क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याला नीट पेपर फूट प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. त्याच्या कोचिंग क्लासेसने दिलेल्या गेस पेपरममधील ४२ प्रश्न हे NEET परीक्षेत आले.
एकेकाळी सायकलवरून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवणारा शिक्षक आज महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोचिंग ब्रँडचा मालक कसा बनला? नीट घोटाळ्यात कसं आलं? जाणून घ्या
शिवराज मोटेगावकर याचा जन्म लातूरमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याने केमिस्ट्री विषयात एमएस्सी केलं आणि त्यात गोल्ड मेडलही मिळवलं, असा दावा त्याच्या संस्थेच्या अधिकृत माहितीमध्ये करण्यात आला आहे.
SET/NET-JRF, DRDO, GATE, BARC आणि TIFR सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा त्याने पास केल्याचंही सांगितलं जातं.
1999 मध्ये शिवराज मोटेगावकर यांने अवघ्या दहा विद्यार्थ्यांसह एका भाड्याच्या खोलीत कोचिंग क्लास सुरू केला. सुरुवातीला तो फक्त केमिस्ट्री शिकवत असत.
RCC म्हणजे रेणुकाई करिअर सेंटर. लातूरमधून सुरू झालेल्या या संस्थेने पुढे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूरपर्यंत विस्तार केला.
विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये शिवराज मोटेगावकर ‘एम सर’ या नावाने ओळखले जातात. अनेक विद्यार्थ्यांसाठी तो केवळ शिक्षक नव्हता, तर करिअर घडवणारे मार्गदर्शक मानले जात होता.
सीबीआयला तपासात केमिस्ट्री विषयातील काही प्रश्न मॉक टेस्ट आणि NEETमध्ये मिळतेजुळते असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर CBIने चौकशी करुन त्याला अटक केली.