सरकारनामा ब्यूरो
मोदी UAE, नॉर्वे, इटली, स्वीडन आणि नीदरलँड्स दौऱ्यावर आहेत, जाणून घ्या भारतासाठी त्यांच्या दौऱ्याला काय महत्व आहे.
तेल आणि गॅस पुरवठ्यात निर्माण झालेली अनिश्चितता तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
या दौऱ्यामागे भारताची दीर्घकालीन रणनीती, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक स्तरावर आपली ताकद वाढवण्याचा मोठा उद्देश आहे.
मिडल ईस्टमधील तणाव, तेल-गॅस पुरवठ्यावरील संकट आणि बदलती जागतिक समीकरणे लक्षात घेता भारताने या दौऱ्याद्वारे एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भारतासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे तेल आणि गॅस पुरवठा सुरळीत ठेवणे. मिडल ईस्टमधील संघर्षामुळे सप्लाय चेनवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर UAE आणि नॉर्वेसारख्या ऊर्जा समृद्ध देशांसोबत भारत दीर्घकालीन ऊर्जा करार करण्याच्या तयारीत आहे. भारताला भविष्यात तेल-गॅस टंचाईचा फटका बसू नये, हा या दौऱ्यामागचा सर्वात मोठा उद्देश मानला जात आहे.
भारतात अधिक विदेशी गुंतवणूक आणणे, भारतीय कंपन्यांना युरोपियन बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नवीन व्यावसायिक करारांना गती देणे, हेही या दौऱ्याचे महत्त्वाचे लक्ष्य आहे.