Sachin Waghmare
लातूरच्या राजकारणात विलासराव देशमुख आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख ही जोडगोळी प्रसिद्ध होती.
विलासराव राज्यात तर दिलीपराव हे लातूरच्या राजकारणात लक्ष घालीत होते.
आता देशमुख घराण्याने हाच प्रयोग कायम ठेवला आहे.
आमदार अमित देशमुख राज्यात लक्ष घालतात.
धाकटे बंधू आमदार धीरज यांनी लातूरवर लक्ष केंद्रीत केले आहे.
धीरज देशमुख आणि अमित देशमुख दोघेही २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले.
धीरज देशमुख हे पहिल्यांदाच लातूर ग्रामीण मतदार संघातून १ लाख १८ हजार मतांनी मताधिक्य मिळवले.
लातूर शहर मतदारसंघातून दोनदा निवडून आलेले अमित देशमुख तिसऱ्यांदा ४२ हजार मतांनी विजयी झाले.
अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी या दोघांचाही प्रचार केला होता.
next : काकांना चितपट करणारा पुतण्या : आमदार संदीप क्षीरसागर