Sandeep Kshirsagar : काकांना चितपट करणारा पुतण्या : आमदार संदीप क्षीरसागर

Vijaykumar Dudhale

काका-पुतण्यांचा संघर्ष

महाराष्ट्राच्या राजकारणाला काका-पुतण्यांचा संघर्ष नवा नाही. त्यात बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्रात गाजत आहे.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama

क्षीरसागर कुटुंबामध्ये जन्म

राज्याच्या राजकारणातील मातब्बर घराणे असलेल्या क्षीरसागर कुटुंबामध्ये संदीप यांचा २७ ऑगस्ट १९८१ रोजी जन्म झाला.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama

घरातूनच मिळाले राजकीय बाळकडू

संदीप क्षीरसागर यांना राजकीय बाळकडू हे घरातूनच मिळाले. संदीप यांच्या आजी केशरकाकू क्षीरसागर या बीडच्या खासदार होत्या. बीडचे राजकीय नेतृत्व एकेकाळी काकूंनी केले होते.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama

क्षीरसागर कुटुंबीयांत २००७ पासून राजकीय वाद

तब्बल २५ वर्षे एकाच घरात राहणाऱ्या क्षीरसागर कुटुंबीयांत २००७ पासून राजकीय वाद सुरू झाले. संदीप क्षीरसागर यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. संदीप हे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सभापती झाले.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama

सख्ख्या काकांना आव्हान

बीड नगरपालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत संदीप यांनी आपले सख्खे काका भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान दिले. भारतभूषण यांच्या विरोधात संदीप यांनी त्यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांना उतरविले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतभूषण यांनी बाजी मारली. पण उपनगराध्य आणि नगरसेवकांमध्ये संदीप यांच्या पॅनेलने वर्चस्व राखले.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama

जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी दुसरे काका, राज्याच्या राजकारणातील मातब्बर मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान दिले. काकांना आव्हान देताना संदीप यांना राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांचे पाठबळ होते, हे पुढे उघड झाले.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama

जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव

संदीप क्षीरसागर यांनी त्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा १९८४ मतांनी पराभव केला.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama

शरद पवारांना साथ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. संदीप हे सध्या शरद पवार गटाचे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama

Next : देशातील सर्वात सुंदर IFS ऑफिसर तमाली साहा; पाहा फोटो

IFS Tamali Saha | Sarkarnama
येथे क्लिक करा