Jagdish Patil
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आल्याने मुंबईसह देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
हल्लेखोर टायगरवर गोळीबार करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बाईकवरून आलेल्या ३ हल्लेखोरांनी हा हल्ला केला असून, या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई याची हिस्ट्री जाणून घेऊया.
लॉरेन्स बिश्नोईचे नाव २९ मे २०२२ रोजी पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर देशभरात चर्चेत आले.
लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर बनला असून, त्याची टोळी मुख्यतः पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रिय आहे.
माध्यमांतील माहितीनुसार, त्याचे खरे नाव सतविंदर सिंग असून, त्याचा जन्म १९९३ मध्ये पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात झाला.
कॉलेजच्या काळात लॉरेन्सने विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्ये भाग घेतला. याच दरम्यान त्याने पहिला खून केला.
या घटनेनंतर त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले. यामध्ये खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि खून यांचा समावेश आहे.
लॉरेन्स सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात असून, तो तुरुंगातूनही आपल्या गँगला नियंत्रित करतो, असे सांगितले जाते.
NCP नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लॉरेन्स पुन्हा चर्चेत आला होता. त्याने सलमान खानला दिलेली जीवे मारण्याची धमकीही सतत चर्चेत असते.