सरकारनामा ब्युरो
1998 पासून सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यात वाद सुरू आहे.
लॉरेन्स बिश्नोईने सलमानला बर्याच वेळा ठार मारण्याची धमकी दिली, त्यानंतर त्याची सुरक्षाही वाढविण्यात आली.
आता अलीकडेच सलमानने त्याच्या चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या धमक्यांवर मौन सोडले आहे.
मारण्याची धमकी मिळत आहे त्यामुळे घाबरत नाही का? यावर तो म्हणाला, 'देव, अल्लाह, या गोष्टी त्यांच्यावरच सोडल्या आहेत.
1998 मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे.
पण सलमान आणि वडील सलीम खान यांनी ही गोष्ट नाकारली आहे. तेव्हापासून, लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या पाठी लागला आहे.
बिश्नोई समाजात काळवीटला देवा समान मानले जाते. ते त्यांचे संरक्षण करण्यासाठी ओळखले जातात.
सलमानमुळे संपूर्ण बिश्नोई समाजाच्या मनावर जखम झाली, असा लॉरेन्स बिश्नोईचा दावा आहे.