Laxman Hake Fortuner: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना गिफ्ट मिळालेल्या 'फॉर्च्युनर लेजेंडर' कारची काय आहेत खास वैशिष्ट्यं?

Deepak Kulkarni

'फॉर्च्यूनर लेजेंडर' ही महागडी कार गिफ्ट

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांविरोधात उभे ठाकणाऱ्या लक्ष्मण हाके यांना ओबीसी समाजाकडून 'फॉर्च्यूनर लेजेंडर' ही महागडी कार गिफ्ट देण्यात आली आहे.

Laxman hake New Fortuner Car | Sarkarnama

आलिशान कारची प्रचंड चर्चा

ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत परभणीत मंगळवारी (ता.27) हाकेंना गिफ्ट केलेल्या फॉर्च्युनर कारची मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे.

Laxman hake New Fortuner Car | Sarkarnama

Toyota Fortuner Legender

टोयोटा कंपनीचं फॉर्च्युनर लेजेंडर Toyota Fortuner Legender हे एक मजबूत आणि शक्तिशाली SUV आहे.

New Fortuner Car | Sarkarnama

शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये लोकप्रिय

ही कार ऑफ-रोड क्षमता आणि आरामदायी ड्रायव्हिंगसाठी ओळखली जाते. ती विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये लोकप्रिय आहे. 

Laxman hake New Fortuner Car | Sarkarnama

201 PS पॉवर आणि 500 Nm टॉर्क

फॉर्च्युनर लेजेंडरमध्ये 2.8-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 201 PS पॉवर आणि 500 Nm टॉर्क निर्माण करते. 

Laxman hake New Fortuner Car | Sarkarnama

मायलेज

मायलेज साधारणतः 14.20 ते 14.40 kmpl (ARAI) असतो, तर शहरी परिस्थितीत 12.00 kmpl आणि महामार्गावर 16.00 kmpl मिळू शकते. 

Laxman hake New Fortuner Car | Sarkarnama

खास वैशिष्ट्यं

8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,वाहन स्थिरता नियंत्रण (VSC),हिल असिस्ट कंट्रोल (HAC),ट्रॅक्शन नियंत्रण प्रणाली, 7 एअरबॅग्ज, व्हेंटिलेटेड आणि पॉवर्ड फ्रंट सीट्स अशी खास वैशिष्ट्यं आहेत.

Laxman hake New Fortuner Car | Sarkarnama

किंमत

फॉर्च्युनर लेजेंडरची किंमत ₹ 44.11 लाखांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत ₹ 48.09 लाखांपर्यंत जाते. फॉर्च्युनर लेजेंडर 4x2 आणि 4x4 या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या लक्झरी कारनं भारतात वेगळा प्रभाव निर्माण केला. 

Laxman hake New Fortuner Car | Sarkarnama

NEXT : इन्कम टॅक्स विभागाचा मोठा निर्णय, रिटर्न फाइल करण्यासाठी आता नवी डेडलाईन

Income-Tax-Return-filing.jpg | sarkarnama
येथे क्लिक करा...