Rashmi Mane
पिंपरी-चिंचवडचे भाजपचे आमदार दिवंगत लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा आज वाढदिवस.
जगताप यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1963 ला पिंपळे गुरव येथील शेतकरी कुटूंबात झाला.
एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरु झालेली त्यांची राजकीय वाटचाल नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य ते थेट विधानसभा आमदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरू झाली होती.
1986 च्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले. त्यांनी महापालिकेत सलग 20 वर्षे नगरसेवक म्हणून पिंपळे गुरवचे प्रतिनिधीत्व केले.
19 डिसेंबर 2000 ते 13 मार्च 2002 या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे 'महापौरपद' भुषविले.
भाजपतर्फे 2014 ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला.
2017 ची महापालिका निवडणूक आमदार जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आणि ऐतिहासिक विजय भाजपने मिळवला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. अशा या वादळाचं 59 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं.