Indian Emergency 1975 : आणीबाणीच्या आंदोलनातून मिळाली रत्ने.. देशाचं राजकारणच बदलून टाकलं!

Rashmi Mane

आणीबाणीने घडवलेले रत्न!

1975 मध्ये लागू झालेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीसाठी एक कठीण परीक्षा होती. पण याच काळात अनेक करारी, लोकशाहीप्रेमी नेते उदयास आले आणि देशाच्या राजकारणाला नवसंजीवनी दिली.

Indira Gandhi | sarkarnama

‘आंदोलनातून नेतृत्व’ – नवीन राजकीय दिशा

या संघर्षमय काळात तयार झालेली ही पिढी केवळ आंदोलक नव्हती, तर पुढे जाऊन त्यांनी देशाच्या निती-निर्मितीत मोलाची भूमिका बजावली.

Emergency in India 1975 | Sarkarnama

आजचं स्वातंत्र्य... त्यांच्या संघर्षातून!

या नेत्यांचा त्याग, संघर्ष आणि लोकशाहीवरील निष्ठा यामुळेच आपण आज मुक्तपणे विचार मांडू शकतो. त्यांच्या आठवणी म्हणजे लोकशाहीचा अमूल्य ठेवा!

Emergency in India 1975 | Sarkarnama

लालकृष्ण अडवाणी

आणीबाणीच्या घोषणा होताच त्यांनी सरकारविरोधी आंदोलनात उडी घेतली. तुरुंगवासानंतर ते संघटनेचे प्रमुख विचारवंत झाले. त्यांची बौद्धिक स्पष्टता व दृढ भूमिका आजही आदर्श ठरते.

Emergency in India 1975 | Sarkarnama

जॉर्ज फर्नांडिस

मुंबईतील झोपडपट्टीतून उठलेला नेता, ज्याने कामगारांचा आवाज दिला. आणीबाणीमध्ये अटक, भूमिगत चळवळ आणि नंतर देशाचे संरक्षणमंत्री होते.

Emergency in India 1975 | Sarkarnama

नितीश कुमार

बिहारमधील बख्तियारपूरमध्ये जन्मलेले नितीश कुमार जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सामील झाले. तुरुंगवास पत्करला आणि पुढे बिहारचे यशस्वी मुख्यमंत्री झाले.

Emergency in India 1975 | Sarkarnama

अटलबिहारी वाजपेयी

पहिल्यांदा अटक झालेल्यांपैकी एक. तुरुंगात असतानाही ते लोकशाहीचे रक्षण करत राहिले. नंतर भारताचे पंतप्रधान झाले आणि आपल्या वक्तृत्वाने देशभरात आदर कमावला.

Emergency in India 1975 | Sarkarnama

मधु लिमये – समाजवादी तेजा

अस्सल मराठमोळे पण बिहारमधून चार वेळा लोकसभेत निवडून गेले. आणीबाणीच्या काळात विविध तुरुंगात ठेवले गेले तरी न डगमगता त्यांनी लोकशाहीची मशाल पेटती ठेवली.

Emergency in India 1975 | Sarkarnama

Next : चार रणरागिणी पेटून उठल्या अन् थेट इंदिरा गांधींविरोधात मैदानात उतरल्या

येथे क्लिक करा