Jagdish Patil
सध्या देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसह अनेक नेते दिवाळी साजरी करण्यासाठी सीमेवर पोहोचले आहेत.
यंदा PM मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी गुजरातच्या कच्छ सीमेवर गेले होते. तिथे त्यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी त्यांनी जवानांचे कौतुक केले आणि BSF जवानांना स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली.
यावेळी मोदींनी सर क्रीक परिसराची पाहणी केली. ते दरवर्षी सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करतात.
PM मोदींनी मागील दिवाळी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे साजरी केली होती.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बीकानेरमध्ये BSF जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
उत्तराखंडचे CM पुष्कर सिंह धामी पौरी गढवालच्या लॅन्सडाउन कॅन्टोन्मेंटमध्ये सैनिकांसोबत 'दिवाळी मिलन' या कार्यक्रमात सहभागी झाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आसाममधील तेजपूर येथील 4 कॉर्प्स मुख्यालयात जवानांसोबत दिवाळीचा साजरी केली.