सरकारनामा ब्यूरो
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या आज तिसरा दिवशीही महाविकास आघाडीने आंदोलन केले.
आज तिसऱ्या दिवशी कापूस, सोयाबिन व तूर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 'शेतमशागतीचे दुप्पट झाले भाव, शेतमालाला शेतकरी मागतोय हमीभाव',“कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती”.
"सोयाबिन तेलाचे भाव गगनाला शेतकऱ्याच्या सोयाबीन मातीला"," बाजारात शेतमालाला मिळत नाही भाव शासन खरेदी केंद्राचे सुरु होत नाही काम" अशा पाट्या दाखवत आंदोलन केले.
“शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”,अशा प्रकारच्या जोरदार घोषणाही दिल्या.
तसेच यावेळी नेत्यांनी हातात सोयाबीन, तूरची रोपं आणि गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळाही घातल्या होत्या
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव सरकारने दिला पाहीजे, ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करा.
यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांसह आमदार अंबादास दानवे, भाई जगताप आंदोलनात सहभागी झाले होते.