Aslam Shanedivan
राज्यात सध्या शस्त्र परवान्यावरून राजकारण तापलं गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत आले आहेत.
गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला दिलेल्या परवान्यावरच हा वाद रंगला आहे. तर कदम यांनी पोलिसांनीच तो परवाना दिल्याचे म्हटलं आहे.
यादरम्यान आता शस्त्र परवाना कसा मिळतो, तो कसा मिळवावा आणि कोणत्या कारणासाठी मिळतो असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत
राज्यात फक्त दोन कारणांसाठीच शस्त्र परवाना दिला जातो. तो आत्मसंरक्षण आणि शेती पीकसंरक्षणासाठीच मिळतो.
यासाठी अर्जदाराला ठरावीक नमुन्यात अर्ज भरावा लागतो. तो पोलिस आयुक्तालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत सादर करावा लागतो.
शस्त्र परवान्यासाटी विहीत नमुन्यातील अर्ज, ओळख पत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साइज फोटो, मतदान ओळखपत्र, मागील तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न, तसेच अर्जदार कोणती बंदूक घेणार आणि त्याचे कारणाची माहिती द्यावी लागते.
तसेच अर्जदाराला दोन व्यक्तीकडून चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक आणि जन्म प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. त्याप्रमाणे फक्त शॉटगन, हँडगन आणि स्पोर्टगन याचाच परवाना मिळतो.
अर्ज प्राप्त झाल्यावर पोलिस अर्जदाराची मुलाखत घेतात. अर्जदाराची मनोवृत्ती, कारण स्पष्टता आणि सुरक्षिततेची तयारी तपासली जाते.
त्यानंतर तो अहवाल गुन्हे शाखा आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे पाठवला जातो. तेथे कोणताच आक्षेप नाही आल्यास अर्जदाराला शस्त्र परवाना मंजूर केला जातो.