बिबट्या येताच सायरन वाजतो, पुण्यात शेतकऱ्यांना वाचवणारे नवे तंत्रज्ञान चर्चेत

Ganesh Sonawane

जुन्नर वन विभागाचा नवा प्रयोग :

ऊस शेतीमुळे वाढलेल्या बिबट्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जुन्नर वन विभागाने एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

Leopard alert Pune (Junnar) Forest Department | Sarkarnama

५५ ठिकाणी बसले स्मार्ट कॅमेरे:

जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील बिबट्या प्रवण क्षेत्रातील ५५ हॉटस्पॉटवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

Leopard alert Pune (Junnar) Forest Department | Sarkarnama

बिबट्या येताच वाजतो सायरन :

कॅमेऱ्याच्या नियंत्रण क्षेत्रात बिबट्या येताच ध्वनिक्षेपकावरून सायरन वाजतो आणि शेतकऱ्यांना तत्काळ अलर्ट मिळतो.

Leopard alert Pune (Junnar) Forest Department | Sarkarnama

मोशन सेन्सरचा प्रभावी वापर :

एआय प्रणालीमध्ये मोशन सेन्सर असल्याने बिबट्याचे फोटो लगेच टिपले जातात आणि ध्वनी अलर्ट सुरु होतो. यासाठी विशेष खांब उभारण्यात आले असून, त्यावरच सायरन लावण्यात आला आहे.

Leopard alert Pune (Junnar) Forest Department | Sarkarnama

शेतकरी-बिबट्या संघर्ष कमी होणार :

या तंत्रज्ञानामुळे शेतकरी वेळेत सावध होतात, त्यामुळे हल्ल्यांच्या घटना कमी होण्यास मदत होत आहे.

Leopard alert Pune (Junnar) Forest Department | Sarkarnama

प्रशांत खाडे यांची माहिती :

उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितले की हा प्रयोग तातडीचा आणि दीर्घकालीन उपाय म्हणून यशस्वी ठरत आहे.

Leopard alert Pune (Junnar) Forest Department | Sarkarnama

विशेष लक्ष

शिरूर तालुक्यातील पिंपळाचा मळा, फराटेवाडी, मांडवगण फराटा, शिवनगर आणि पिंपळसुटी या भागांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Leopard alert Pune (Junnar) Forest Department | Sarkarnama

टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार यंत्रणा :

पुढील टप्प्यात ऊस प्रवण इतर गावांमध्येही एआय कॅमेरे आणि सायरन बसवले जाणार आहेत, अशी माहिती वन विभागाने दिली.

Leopard alert Pune (Junnar) Forest Department | Sarkarnama

NEXT : निवडणुकीतील आश्वासनांबाबत कायदा आहे का? सुप्रीम कोर्टात गेलं होतं प्रकरण...

Political leader | Sarkarnama
येथे क्लिक करा