Ganesh Sonawane
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने ‘विमा सखी योजना’ सुरू केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व दरमहा उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना आहे.
LIC एजंट म्हणून पहिल्या तीन वर्षांत कामगिरीनुसार स्टायपेंड दिले जाईल. पहिल्या वर्षी महिलांना दरमहा 7000 रुपये निश्चित वेतन दिले जाणार आहे.
दुसऱ्या वर्षी दरमहा 6000 रुपये मिळतील, पण त्यासाठी पहिल्या वर्षी घेतलेल्या किमान 65% पॉलिसी दुसऱ्या वर्षीही सुरू राहणे आवश्यक.
विद्यमान एलआयसी एजंट किंवा कर्मचाऱ्यांशी संबंधित महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. (म्हणजेच पती/पत्नी, मुले (जैविक, दत्तक, सावत्र, अवलंबित किंवा नसलेले), पालक, भावंडे आणि सासू-सासरे हे यासाठी अर्ज करु शकणार नाहीत.)
पात्रतेसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 70 वर्षे असावे. तसेच अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निवृत्त कर्मचारी आणि माजी एजंट यांनाही संधी नाही. योजनेचा उद्देश नवीन महिला एजंट घडवणे हा आहे.
महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे हा या योजनेचा उद्देश. दरमहा मिळणारे उत्पन्न आर्थिक समस्या सोडविण्यास मदत करेल.
ही योजना महिलांना विमा क्षेत्रात करिअरची संधी देते. त्यातून दीर्घकालीन उत्पन्न व स्थिर व्यवसाय घडवता येईल.