सरकारनामा ब्यूरो
माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस नेते शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 ला लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला होता.
उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1967-69 या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे शुक्रवार (ता.12) निधन झाले. लातूर मतदारसंघातून तब्बल 7 वेळा त्यांनी लोकसभेला विजय मिळवला होता.
मात्र 35 वर्ष पराभूत न होणाऱ्या शिवराज पाटील यांच्यासाठी 2004 ची निवडणूक ही कलाटणी देणारी ठरली होती. त्यांना 2004 च्या निवडणूकीत पराभव पत्कारावा लागला होता.
2004 मध्ये पराभूत झाले असले तरी सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत पराभूत झालेल्या उमेदवाराला चक्क देशाचे गृहमंत्रीपद दिले होते.
शिवराज पाटील यांनी लोकसभेचे माजी अध्यक्ष, गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल या पदांवरही काम केले आहे.
शिवराज पाटील जर का 2004 मध्ये पराभूत झाले नसते, तर देशाच्या पंतप्रधानपदी त्यांचीच निवड जवळपास निश्चित होती. मात्र पराभवामुळं त्यांना पंतप्रधानपद मिळू शकले नसल्याचे सांगितले जाते.
जर 2004 ला पाटील निवडून आले असते तर देशाला पहीला मराठी पंतप्रधान मिळाला असता, अशी देखील त्यावेळी चर्चा झाली होती. त्यावेळी ते पंतप्रधान पदासाठी प्रमुख दावेदार होते.