Ganesh Sonawane
राज्यातील मद्यप्रेमींसाठी चिंताजनक बातमी असून आता त्यांचे आर्थिक बजेट बिघडणार आहे. महाराष्ट्रात दारु महागली आहे.
नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर तब्बल दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे 14 हजार कोटींचा महसूल वाढणार आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. १८० मिली मद्याच्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. तर देशी मद्य ८० रुपये, राज्यातील मेड लिकर १४८ रुपये, भारतीय बनावटीचे विदेश मद्य २०५ रुपये, विदेशी मद्याच्या प्रिमीयम ब्रँडची किंमत ३६० रुपये इतकी करण्यात आली आहे.
याशिवाय राज्य सरकारने आता सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता दिली आहे. यावर एकुण दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागात १२२३ पदे नव्याने भरली जाणार आहेत.
तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.