Rajanand More
महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.
निवडणुकीची कितीही तयारी केली तरी शुल्लक कारणांमुळे उमेदवारी अर्जच बाद झाला तर. ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून काय चुका करू नयेत, हे पाहुयात.
उमेदवार कायदेशीर तरतुदींनुसार निवडणूक लढण्यास अयोग्य असल्यास निवडणूक अधिकारी उमेदवारी अर्ज रद्द करू शकतात. उदा. कमी वय, विशिष्ट कारणामुळे आधीच अयोग्य घोषित केले असल्यास.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे वेळेत दिली नाहीत, अर्ज उमेदवार किंवा प्रस्तावकाऐवजी दुसऱ्याने जमा करणे, यामुळेही अर्ज बाद होतो.
उमेदवारी अर्जासाठी प्रस्तावकांची अपुरी संख्या किंवा त्यांची नकली सही, अर्ज आयोगाने निश्चित केलेल्या नमुन्यात नसल्यास.
मतदारसंघ आरक्षित असल्यास संबंधित प्रवर्गातील व्यक्तीने अर्ज केला नसल्यास किंवा संबंधित प्रवर्गातील उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यास.
उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराला आवश्यक प्रतिज्ञापत्र जोडावे लागते. त्यामध्ये अपेक्षित सर्व माहिती नमूद असणे आवश्यक आहे.
नाव किंवा पत्त्यामध्ये किरकोळ पण ओळख पटवणारी चूक असल्यास, निवडणूक चिन्हाशी संबंधित अपूर्ण माहिती आदी किरकोळ कारणांमुळे अर्ज बाद केला जात नाही.