Rajanand More
केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्व वाढत चालले आहे.
वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षात फूट. त्यानंतरही चिराग यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द करून दाखवले.
चिराग यांनी सत्तेत आल्यापासून सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यापैकी काही निर्णय सरकारला मागे घ्यावे लागले आहेत.
वक्फ सुधारित विधेयक जेपीसीकडे पाठवावे, अशी चिराग यांची मागणी होती. त्यानुसार सरकारला एक पाऊल मागे घेत हे विधेयक जेपीसीकडे पाठवावे लागले.
'यूपीएससी'कडून परीक्षेशिवाय केंद्रात 45 पदांवर भरती केली जाणार होती. त्यात आरक्षण नसल्याने चिराग यांनी कडाडून विरोध केला. ही प्रक्रिया लगेच रद्द करण्यात आली.
जातनिहाय जनगणनेला भाजप नेत्यांकडून विरोध केला जातो. चिराग यांच्याकडून मात्र उघडपणे या मागणीचे समर्थन केेले जात आहे.
सुप्रीम कोर्टाने एससी, एसटी आरक्षणांतर्गत उपवर्गीकरणास दिलेल्या मान्यतेला चिराग यांनी विरोध केला आहे. याबाबत मोदींकडे निर्णय बदलण्याची मागणी.
उपवर्गीकरण तसेच क्रिमिलेअरच्या विरोधात एससी, एसटी संघटनांनी नुकत्याच पुकारलेल्या भारत बंदला चिराग यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता.