Akshay Sabale
महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा एक सर्व्हे समोर आला आहे.
या सर्व्हेनुसार, राज्यातील सहापैकी चार झोनमध्ये महाविकास आघाडी बाजी मारत असल्याचे दिसते.
महायुतीला केवळ एकाच झोनमध्ये आघाडी असून एका झोनमध्ये युती आणि आघाडीला सारख्याच जागा मिळताना दिसत आहेत.
‘लोक पोल’च्या ताज्या सर्व्हेनुसार, महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येऊ शकते. महायुतीला केवळ 115 ते 128 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
महाविकास आघाडी 141 ते 154 जागांपर्यंत मुसंडी मारेल, असे या सर्व्हेतून पुढे आले आहे. इतर पक्ष किंवा अपक्षांना पाच ते 18 जागा मिळू शकतात.
मतांच्या टक्केवारीमध्ये फारसे अंतर नसेल. महायुतीची टक्केवारी 38 ते 41 आणि आघाडीची 41 ते 44 टक्के असेल.