Akshay Sabale
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी तयार झालं आहे. यातच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विरोधकांचं टेन्शन वाढवलं आहे.
सत्तारूढ भाजपला दक्षिण आणि पूर्व भारतात जबरदस्त फायदा होणार आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
पूर्व आणि दक्षिण भारतातील मतदार संघामध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढणार आहे. प्रामुख्यानं दक्षिण भारतात भाजपला चांगलं यश मिळू शकते, असं किशोर यांनी म्हटलं.
भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांकडे खूप संधी होती. पण चुकीच्या निर्णयांमुळे ही संधी घालवली, असं किशोर म्हणाले.
तेलंगणामध्ये भाजप पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहील. ही मोठी गोष्ट आहे, असं सुद्धा किशोर यांनी सांगितलं.
ओडिशामध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर राहील. बंगालमध्ये भाजपला चांगली संधी असून तृणमूल काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावाही किशोर यांनी केला.
तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये एकूण 204 जागा आहेत. पण, भाजपला 50 पेक्षा जास्त जागा अद्याप जिंकता आल्या नाहीत.
यावेळी 50 चा आकडा पार केला जाऊ शकेल, असे भाकित किशोर यांनी वर्तवले आहे.
एकट्या भाजपला 370 जागा मिळणार नाहीत. भाजपने निवडणुकीसाठी हे केवळ ध्येय निश्चित केले आहे, असंही किशोर यांनी म्हटलं.