Chetan Zadpe
आदित्य ठाकरे 2019 मध्ये शिवसनेसाठी यांनी 151 जागांचा आग्रह धरला होता. त्यामुळे युती तुटली. शिवसेनेच्या हट्टापायीच मला मुख्यमंत्रीपद मिळाले,असे फडणवीस म्हणाले.
1999 मध्ये काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.
"2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय फार विचापूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवारांकडे नवखे असल्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्नच नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदा सोपविले असते, तर भविष्यात पक्षात फूट पडली असती," असे शरद पवार म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांसोबत चर्चा झाली होती. त्यासाठी फडणवसी अनुकूल होते, असा गौप्यस्फोट ठाकरेंनी केला.
लोकसभा निवडणुकींच्या ४ जून रोजीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीत येतील, असा दावा देसाई यांनी दिला आहे.
2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. शरद पवारांसह आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. मात्र शिवसेना बाहेर पडली पाहिजे, अशी आमची अट होती. त्यावर अमित शाहांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला, असा गौप्यस्फोट तटकरेंनी केला.
महायुतीमध्ये ठाण्याची शिवसेनेच्या वाट्याला गेला. मात्र, ठाणे लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षानेच लढवावा, अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांनी केला.
'अयोध्यामध्ये मी स्वत: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो. यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असे सांगितले,' असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.