Akshay Sabale
बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा दिला आहे.
बजरंग सोनवणे यांनी 'घड्याळ' सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
बजरंग सोनवणे हे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून साखर कारखानदारीत चांगलं काम करत सोनवणेंनी आपला दांडगा संपर्क तयार केला आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून सोनवणेंनी काम केलं आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे विरुद्ध प्रीतम मुंडे यांच्यात लढाई झाली होती. पण, सोनवणेंना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचं काम सुरू ठेवलं होतं.
सोनवणेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणं म्हणजे धनंजय मुंडेंसाठी धक्का मानला जातोय.
सोनवणेंना महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.