Rajanand More
सुलतानपूरमधील बाहुबली नेता आणि माजी आमदार चंद्रभद्र सिंह उर्फ सोनू सिंह यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
2019 मध्ये सुलतानपूरमधूनच भाजप नेत्या मेनका गांधींविरोधात लोकसभा निवडणूक लढवली. केवळ 14 हजार मतांनी पराभव.
सोनू सिंह बसपामधून समाजपादी पक्षात आल्याने मेनका गांधींचे टेन्शन वाढले आहे. सपा उमेदवाराची ताकद वाढली आहे.
सोनू सिंह व त्यांचे बंधू मोनू सिंह यांचा सुलतानपूरमध्ये चांगलाच दबदबा आहे. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. मोनू यांनी ब्लॉक प्रमुख म्हणूनही काम केले आहे.
सोनू सिंह यांनी 2002 मध्ये सपामधूनच राजकारणात प्रवेश केला. सात वर्षांतच बसपामध्ये दाखल. तर 2012 मध्ये पीस पक्षाकडून विधानसभा लढवली.
2014 मध्ये सोनू व मोनू सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वरुण गांधी यांना निवडणुकीसाठी मदत. 2029 मध्ये पुन्हा बसपामध्ये जात लोकसभेचे तिकीट मिळवले.
सोनू सिंह तीनदा आमदार. 2009 मध्ये बसपाकडून इसौली विधानसभा मतदारसंघातून तिकीट. यावेळी ते एका हत्याकांड प्रकरणी तुरुंगात होते. तरीही निवडणूक जिंकली.
2021 मध्ये बसपाने सोनू सिंह यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर कोणत्याही पक्षात गेले नाहीत. आता लोकसभेच्या रणधुमाळीत सपामध्ये प्रवेश.