Rajanand More
समाजवादी पक्षाकडून कनौज लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उतरणार होते मैदानात.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कन्या राजलक्ष्मी यांचे पती. 2015 मध्ये दोघांचा विवाह.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील नेते लग्नाला उपस्थित होते.
मुलायमसिंह यादव यांच्या बंधूंच्या मुलीचे नातू असून, अखिलेश यांचे भाचे आहेत. अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय.
मैनपुरी लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये निवडणूक लढवून विजयी झाले होते. मुलायमसिंह यांनी दिला होता राजीनामा.
वाणिज्य शाखेचे पदवीधर असून, लंडनमधील लीड्स विद्यापीठातून एमबीएची पदवी प्राप्त केली आहे.
कनौजमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने उमेदवारीवर टांगती तलवार. अखिलेश यादव घेणार निर्णय.
तेजप्रताप यांचा पत्ता कट करून अखिलेश स्वत: निवडणुकीत उतरण्याची शक्यता. एक-दोन दिवसांत घोषणा होण्याची शक्यता.
मैनपुरी मतदारसंघासाठी होते इच्छुक. पण डिंपल यादव यांना उमेदवारी दिली असून, सध्या त्यांच्याच प्रचारात व्यस्त.
R