Rashmi Mane
लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिला पार पडला.
लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहताना दिसते. पक्षांकडून उमेदवार घोषित झाले आहेत आणि प्रचाराला सुरुवात झाली आहे.
निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करतात.
या जाहीरनाम्याद्वारे, पक्ष सत्तेवर आल्यास पक्ष काय करतील हे जनतेला सांगतात.
जाहीरनामा म्हणजे पक्ष सत्तेत आल्यास प्रस्तावित कृतींचा रोडमॅप असतो हा पक्षाची धोरणे, उद्दिष्टे मतदारांसमोर मांडतात.
राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांचा अजेंडा, प्राधान्यक्रम, प्रस्तावित प्रश्नांवर उपाय सांगतात.
या जाहीरनाम्यावरून मतदार आपली भूमिका स्पष्ट करतो. विविध पक्षांनी दिलेली आश्वासने पाहून त्याचे मूल्यांकन करून मतदार कोणाला मतदान करणार याचा निर्णय घेऊ शकतो.
निवडणुकीपूर्वी मतदार पक्षांची आश्वासने पाहू शकतात आणि त्याचे मूल्यांकन करू शकतात. ज्यामुळे मतदारांनी हे निश्चित करण्यात मदत होते की, मतदान कोणत्या पक्षाला करावे.
R