Mangesh Mahale
उद्धव ठाकरेंशी पंगा घेणारी बॉलिवूड क्वीन कंगना रनाैतला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे.
'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांना मथुरा येथून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरवले आहे. येथून त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत.
हुगळी मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा बंगाली अभिनेत्री, विद्यमान खासदार लॉकेट चॅटर्जी यांना उमेदवारी दिली आहे.
भोजपुरी चित्रपट गायक, अभिनेता दिनेशलाल यादव ऊर्फ ‘निरहुआ’ यांना आझमगडमधून भाजपने तिकीट दिले आहे.
रामायण या टीव्ही मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठमधून उमेदवारी दिली आहे.
ईशान्य दिल्लीतून भोजपुरी स्टार मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली. ते या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत.
अभिनेत्री आणि टेलिव्हिजन निर्मात्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुन्हा अमेठीमधून निवडणूक लढवणार आहेत.
केरळमधील त्रिशूर येथून गायक, दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेते सुरेश गोपी यांना भाजपने तिकीट दिले आहे.
R
NEXT: ...म्हणून अभिजीत बिचुकले सातारा लोकसभा निवडणूक लढवणार!