Sharad Pawar News :...अन् साताऱ्यात शरद पवारांनी उडवली 'कॉलर'; नेमकं काय घडलं?

Satara Lok Sabha Election 2024 : "श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देऊन लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे," असं शरद पवारांनी सांगितलं.
udayanraje bhosale sharad pawar
udayanraje bhosale sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

राजकारणात अनेक नेत्यांच्या स्टाइल प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक म्हणजे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले. त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलवर समर्थक अगदी जीव ओवाळून टाकतात. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी साताऱ्यात कॉलर उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट ( Udayanraje Bhosale ) शरद पवारांनी कॉलर उडवून एकप्रकारे उदयनराजेंना आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.

"साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देऊन लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे साताऱ्यातून राष्ट्रवादी येत्या दोन दिवसांत नव्या उमेदवारची घोषणा केली जाईल," अशी माहिती शरद पवारांनी ( Sharad Pawar ) दिली. पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवतील, ही चर्चा पवारांनी फेटाळून लावली. ही जागा राष्ट्रवादीची असल्याचं पवारांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, सुनील माने, सत्यजित पाटणकर आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नावांवर चर्चा झाली आहे. यातील एकाचे नाव जाहीर केलं जाईल," असं पवारांनी म्हटलं.

udayanraje bhosale sharad pawar
Lok Sabh Election 2024 : श्रीनिवास पाटलांची माघार; सातारा लोकसभेसाठी बाळासाहेब पाटलांना सर्वाधिक पसंती

साताऱ्यातून उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांची उमेदवारी अद्याप जाहीर केली नाही. उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क साधला का? संपर्क केला, तर प्रतिसाद देणार का? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार 'नाही' म्हणत पक्षाचे त्यांच्यासाठी दरवाजे बंद असल्याचं स्पष्ट केलं. या वेळी कॉलर उडवण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारताच शरद पवारांनी कॉलर उडवली. यानंतर एकच हशा पिकला.

"माढ्यातून धनगर समाजाला जागा द्यावी, अशी आमची इच्छा होती. ती जाहीरपणानं मी बोलून दाखवली होती. त्यासंबंधी त्यांच्याशी ( महादेव जानकर ) चर्चा झाली होती. पण, नंतर काय झालं माहिती नाही. निवडणुकीत मतदार पळवतात तसं उमेदवारही पळवण्यात आले. त्यामुळे योग्य उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. सामाजिक समतोल राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत," असं शरद पवारांनी सांगितलं.

R

udayanraje bhosale sharad pawar
Sharad Pawar News : साताऱ्यातून लोकसभा लढण्यास शरद पवारांचा नकार; काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com