Akshay Sabale
लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिल्यानं राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस विरोधी पक्षांना सोबत घेत आहे.
दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते. अखेर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
दिल्ली, गुजरात, हरियाणा आणि गोवा अशा चार राज्यांमध्ये दोन्ही पक्षांची आघाडी असेल; पण पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील. पंजाबमध्ये 'आप'ची सत्ता आहे.
दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. त्यातील चार जागा 'आप'ला सोडण्यात आल्या आहेत.
पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली, नवी दिल्ली, पूर्व दिल्लीत केजरीवालांचा 'आप' लढेल, तर चांदनी चौक, ईशान्य दिल्ली आणि वायव्य दिल्ली मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला आहेत.
सध्या या सातही जागांवर भाजपचे खासदार आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या 'आप'ची सत्ता आहे.
गुजरातमध्ये काँग्रेस 24 जागा लढवेल, तर भरुच आणि भावनगर मतदारसंघात 'आप'चे उमेदवार असतील.
हरियाणात लोकसभेच्या 10 जागा आहेत. त्यातील 9 जागा काँग्रेस, तर 1 जागा आप लढवणार आहे.
गोव्यात लोकसभेच्या केवळ 2 जागा आहेत. या दोन्ही जागा काँग्रेस लढवणार आहे.
R