Congress Manifesto : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे आरक्षण, नोकरी, भागीदारीची ‘ही’ गॅरंटी...

Rajanand More

काँग्रेसचे न्याय पत्र

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध. ‘न्याय पत्र’ असे नाव. 

Rahul Gandhi | Sarkarnama

5 न्याय, 25 गॅरंटी

महिला, युवा, कामगार, भागीदारी आणि शेतकरी या पाच मुख्य मुद्द्यांच्या अनुषंगाने या घटकांना 25 गॅरंटी देण्यात आल्या आहेत.

Congress Manifesto | Sarkarnama

एमएसपीची हमी

शेतमालाला किमान आधारभूत किमतीचा कायदा, तसेच कर्जमाफी आयोग स्थापन करण्याचे अन् जीएसटीमुक्त शेतीचे आश्वासन.

Congress Manifesto | Sarkarnama

आरक्षणाची मर्यादा हटवणार

एससी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षणाची 50 टक्केंची मर्यादा वाढवण्यात येईल. तसेच जातनिहाय जनगणना केली जाईल.

Congress Manifesto | Sarkarnama

महिलांना आरक्षण

महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले जाईल. गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक लाख रुपये.

Congress Manifesto | Sarkarnama

युवकांसाठी 30 लाख नोकऱ्या

युवकांसाठी 30 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे काँग्रेसचे आश्वासन. एक वर्षाच्या आत रिक्त पदे भरणार.

Congress Manifesto | Sarkarnama

कंत्राटी पद्धत बंद होणार

सरकारी कार्यालयांतील कंत्राटी पद्धत बंद केली जाणार. कामगारांना किमान मजुरी निश्चित करण्याचे आश्वासन.

Congress Manifesto | Sarkarnama

पेन्शनमध्ये वाढ

ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग पेन्शन वाढवून एक हजार रुपये प्रतिमहिना. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना 10 टक्के आरक्षण.

R

Congress Manifesto | Sarkarnama

NEXT : चर्चेत असणाऱ्या आयपीएस अधिकारी अनु बेनिवाल ?