Akshay Sabale
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते-पाटील कुटुंबाला लक्ष्य केलं.
फडणवीस म्हणाले, निंबाळकरांविरोधातील उभे राहिलेल्या उमेदवाराचं ( धैर्यशील मोहिते-पाटील ) प्रतिज्ञापत्र पाहा. माळशिरस तालुक्याला त्यांच्या ( मोहिते-पाटील ) दहशतीतून मुक्त करणार आहे.
त्यांनी सामान्य माणसाला त्रास दिला, जमिनी बळकावल्या, लोकांचे खून आणि हल्ले केले. हे सहन केलं जाणार नाही. ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही. इथे ठोकशाही चालू दिली जाणार नाही.
50 वर्षे ज्यांना नेतृत्व दिलं, ते प्रत्येक निवडणुकीत तीच-तीच भाषणं देत घोषणा करत होते. पण, त्या घोषणा कधीही पूर्ण झाल्या नाहीत.
सोलापूरला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयदादा एकत्र आले होते.
तेव्हा त्यांनी 30 वर्षांनी पुढील पिढीच्या भविष्यासाठी एकत्र आल्याचं सांगितलं. ही पुढची पिढी म्हणजे जनता नाही. तुमच्या भविष्यासाठी हे एकत्र आले नाहीत.
शरद पवार सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे प्रणिती यांच्यासाठी आणि विजयदादा धैर्यशील, रणजितदादांसाठी एकत्रित आले आहेत, असं म्हणत फडणवीसांनी लक्ष्य केलं आहे.
R