Raosaheb Danve Net Worth : 4 कोटींचं कर्ज अन् 50 तोळे सोनं; रावसाहेब दानवेंची एकूण संपत्ती किती?

Akshay Sabale

पाच वर्षांत संपत्तीत वाढ -

जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत असलेले रावसाहेब दानवे यांच्या उत्पनात गेल्या पाच वर्षांत 26 लाख 52 हजार रूपयांची वाढ झाली.

Raosaheb Danve | sarkarnama

स्थावर अन् जंगम मालमत्ता -

दानवे यांच्याकडे सध्या 24 कोटी 37 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता असून 4 कोटी 51 लाख रूपयांची जंगम मालमत्ता आहे.

Raosaheb Danve | sarkarnama

कर्ज -

रावसाहेब दानवे यांच्यावर 4 कोटी 2 लाखांचं कर्ज आहे.

Raosaheb Danve | sarkarnama

पत्नीकडे स्थावर अन् जंगम मालमत्ता -

रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्या नावे 12 कोटी 83 लाख 38 हजार रूपयांची स्थावर आणि 88 लाख 44 हजार रूपयांची जंगम मालमत्ता आहे.

Raosaheb Danve | sarkarnama

पत्नीवर कर्ज -

निर्मला दानवे यांच्यावर 3 कोटी 46 लाख 33 हजार रूपयांचं कर्ज आहे.

Raosaheb Danve | sarkarnama

वारसहक्कानं मिळालेली मालमत्ता -

रावसाहेब दानवे यांना 93 लाख रूपयांची तर निर्मला दानवेंना 3 कोटी 88 लाख 36 हजार रूपयांची मालमत्ता वारसाहक्कानं मिळालेली आहे.

Raosaheb Danve | sarkarnama

शेअर -

जिजामाता गृहनिर्माण संस्था, मुंबई यात 2 लाख 50 हजार रूपयांचे शेअर यासह रामेश्वर साखर कारखाना, सिध्देश्वर साखर कारखाना आणि स्थानिक सहकारी संस्थेत दानवे यांचे शेअर आहेत.

Raosaheb Danve | sarkarnama

ठेवी -

रावसाहेब दानवे यांच्या पोस्टात 6 कोटी 44 लाख विविध बँक आणि सहकारी पतसंस्थेत 2 कोटी 46 लाख 36 हजार रूपयांच्या ठेवी आहेत.

Raosaheb Danve | sarkarnama

सोनं, चांदी -

रावसाहेब दानवेंजवळ 5 तोळे सोने आणि 4 किलो 700 ग्रॅम चांदी आहे. निर्मला दानवेंजवळ 45 तोळे सोने आणि 2 किलो 700 ग्रॅम चांदी आहे. 18 लाख 24 हजार रूपयांचे पशूधन दानवेंजवळ आहे.

Raosaheb Danve | sarkarnama

शेतजमीन -

दानवे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे जवखेडा बु. आणि खु. भोकरदन, राजूर, नळणी, जालना, जळगाव सपकाळ, विझोरा, धावडा, पद्मावती, तपोवन या ठिकाणी सुमारे 70 एकर शेतजमीन आहे.

Raosaheb Danve | sarkarnama

NEXT : पाच कोटींचा बंगला, 41 तोळे सोनं; मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती किती?

Murlidhar Mohol | sarkarnama
क्लिक करा...