Rashmi Mane
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असून आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे.
एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून त्यानंतर 4 जूनला निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
या निवडणुकीत देशभरातील कोट्यवधी लोक मतदानासाठी सज्ज झाले आहेत.
पण तुम्हाला माहीत आहे का, मतदानाच्या दिवशी तुम्ही दुसऱ्या शहरात असाल, तर तुम्हाला पोस्टानं मतदान करता येतं.
लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील कोट्यवधी लोक मतदानासाठी सज्ज झाले आहेत.
मेट्रो, रेल्वे, वीजपुरठा विभाग, ऊर्जा विभाग, बीएसएनएल, एमटीएनएल, टपाल, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडियो (आकाशवाणी),अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, एक्साईज ट्रेझरी ऑफिस, वन विभाग, नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर्स, आरोग्य विभाग, अँब्युलन्स सर्व्हिस, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सार्वजनिक बांधकाम विभाग,
हवाई विभाग, एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, प्रेस इन्फर्मेशन ब्युरो, माहिती आणि जनसंपर्क विभाग, सरकारी आणि सहकारी दूध पुरवठ्या कंपन्या, जलपुरवठा विभाग, जलवाहतूक, वाहतूक विभागआणि वाहतूक पोलिस, पोलिस दलातील लोक, तुरुंगात काम करणारे कर्मचारी, सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड, निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेले पत्रकार तसेच लष्कर, हवाई दल, नौदलात काम करणाऱ्या व्यक्तींना असं मतदान करता येऊ शकतं.
जर तुम्ही भारत सरकारच्या अंतर्गत भारताबाहेर काम करत असाल, तर तुम्ही सर्व्हिस व्होटर म्हणून तुमचे मत देऊ शकता.
त्याशिवाय तिन्ही दलात काम करणाऱ्या व्यक्तींना अशा पद्धतीने मतदान करता येऊ शकतं. अशा लोकांना 'सर्व्हिस व्होटर' असे म्हटले जाते.