Ravindra Waikar News : घोटाळ्यांचे आरोप, ईडी चौकशी; रवींद्र वायकर यांची संपत्ती किती?

Akshay Sabale

उत्तर-पश्चिमधून तिकीट -

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षातून माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उत्तर-पश्चिम मुंबईतून तिकीट जाहीर केलं आहे.

संपत्तीत किंचित वाढ -

उत्तम-पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर, अशी लढत होणार आहे. गेल्या पाच वर्षांत रवींद्र वायकर यांच्या संपत्तीत किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे.

विवरण पत्र -

घोटाळ्यांचे आरोप, ईडी चौकशी या कारणांमुळे चर्चेत असलेल्या वायकरांच्या संपत्ती विवरणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं.

2019 जंगम मालमत्ता -

2019 मध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे 10 कोटी 19 लाख 36 हजार 110 रुपये इतकी जंगम मालमत्ता होती.

2024 जंगम मालमत्ता -

2024 मध्ये जंगम मालमत्तेत वाढ होऊन ती 12 कोटी 20 लाख 64 हजार 298 रुपये इतकी झाली आहे.

चौकशी -

रवींद्र यांच्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल आहे. सक्तवसुली संचालनालयाची चौकशी सुरू आहे.

संयुक्तरित्या नावावर जमीन -

रवींद्र वायकर आणि त्यांची पत्नी मनीषा यांच्याकडे खेड, रत्नागिरी येथे 2.64 एकर आणि 1 एकर 15.86 गुंठे जमीन या दोन जमीन संयुक्तरित्या नावावर आहे.

पत्नीच्या नावावर जमीन -

मनीषा यांच्या नावावर कोर्लई, रायगड येथील 4.67 एकर जागा असून त्याचे बाजारमूल्य 2.75 कोटी रुपये इतके आहे.

NEXT : श्रीकांत शिंदेंशी लढणाऱ्या वैशाली दरेकरांकडे 'एवढी' संपत्ती; तर दोन गुन्हेही दाखल

Vaishali Darekar | sarkarnama