Mangesh Mahale
हैदराबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएचे प्रमुख असदुद्दीन ओवसी यांच्या विरोधात भाजपने डॉ. माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे.
ओवेसींच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याविरोधात कट्टर हिंदुत्वाचा चेहरा माधवी लता यांची उमेदवारी जाहीर करुन नवा चेहरा दिला आहे.
हैदराबादमध्ये ओवेसी कमी पैशात रुग्णालय चालवतात, माधवी लता यांचेही रुग्णालय आहे. त्या रुग्णालयाच्या अध्यक्षा आहेत.
माधवी लता या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.
माधवी लता या भरतनाट्यम नृत्यागंना असून सामाजिक कामातही त्या सक्रिय आहेत.
माधवी ट्रस्ट आणि विविध संस्थांच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्या कार्यरत आहेत.
निराधार मुस्लिम महिलांसाठी त्यांनी एका फंडाची स्थापन केली. सांस्कृतिक संस्थांशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्या गोशाळा चालवतात.
लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाऊंडेशनच्या अध्यक्षही आहेत.
तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी त्यांनी मुस्लिम महिला संघटनांसोबत घेऊन लढा उभारला होता. त्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या.
हैदराबादची जागा १९८४ पासून ही एमआयएमच्या ताब्यात आहे. असदुद्दीन यांचे वडील सुलतान सलाउद्दीन 1984 मध्ये निवडून आले होते.
सुलतान सलाउद्दीन यांनी वीस वर्ष हैदराबादवर राज्य केलं त्यानंतर त्यांचे चिरंजीव खासदार असुद्दीन ओवेसी हे खासदार आहेत.