Akshay Sabale
2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपनं 400 पारचा नारा दिला आहे. पण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सात राज्यांमध्येच भाजपनं 95 टक्क्यांपेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या.
मध्य प्रदेशात लोकसभेच्या 29 जागा आहेत. तिथे 2019 मध्ये भाजपनं 28 जागा तर काँग्रेसनं 1 जिंकली होती.
11 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपनं 9 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले होते.
राजस्थानमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत. तिथे सर्वंच जागांवर भाजपला विजय मिळाला होता. तर, राज्यात सत्तेत असूनही काँग्रेस भोपळा फोडला आला नव्हता.
हिमाचलमधील चारही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. येथेही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते.
गुजरात हा भाजपला बालेकिल्ला आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. तिथेही काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं होतं. तर, भाजपनं 26 ही जागा जिंकल्या होत्या.
हरियाणात लोकसभेच्या 10 जागा आहेत. येथील 9 जागा 2019 मध्ये भाजपनं जिंकल्या होत्या. तर, काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला होता.
गेल्या दोन लोकसभेत भाजपनं येथील सर्वच्या सर्व 5 जागा जिंकल्या होत्या. 2014 मध्ये भाजपला 56 टक्के मते होती. ती 2019 मध्ये 62 टक्क्यांवर गेली.