Akshay Kanti Bam : पहिल्याच निवडणुकीत पलटी..! कोण आहेत काँग्रेसला धक्का देणारे अक्षय कांती बम?

Rajanand More

अक्षय कांती बम

इंदौर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. भाजपच्या उमेदवाराला जोरदार टक्कर देणार असल्याची चर्चा होती.

Akshay Kanti Bam | Sarkarnama

सकाळपर्यंत प्रचार

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचार जोरात सुरू होता. सोमवारी सकाळीही प्रचारात अन् नंतर तासाभरातच 'नॉट रिचेबल'.

Akshay Kanti Bam | Sarkarnama

निवडणुकीतून माघार

राजकारणात प्रवेश केल्यानंतर बम यांची ही पहिलीच निवडणूक होती. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली.

Akshay Kanti Bam | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

बम यांनी काँग्रेसला धक्का देत आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी बम यांनी काँग्रेसला झटका दिला आहे.

Akshay Kanti Bam with Kailash Vijayvargiya | Sarkarnama

10 वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय

मागील 10 वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते. विधानसभा निवडणुकीतही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.

Akshay Kanti Bam | Sarkarnama

दिग्विजय सिंह यांचे समर्थक

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सिंह यांनाही मोठा झटका.

Akshay Kanti Bam | Sarkarnama

शैक्षणिक संस्थाचालक

इंदौरमध्ये बम यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. या माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण करत राजकारणात पाऊल ठेवले.

Akshay Kanti Bam | Sarkarnama

मुंबईत शिक्षण

इंदौरमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतून बीकॉम पदवी मिळवली. पुढे इंदौरमध्येच एलएलबी, एमबीए पदवी प्राप्त केली.

Akshay Kanti Bam | Sarkarnama

14 लाखांचे घड्याळ

बम यांची एकूण 57 कोटींची संपत्ती असून, त्यांचे घड्याळ 14 लाख रुपयांचे आहे, तर पत्नीच्या नावावर 21 कोटींची संपत्ती आहे.

R

Akshay Kanti Bam | Sarkarnama

NEXT : पाच जागांवर तिढा सुटेना, उमेदवारीसाठी महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी; पाहा यादी!