Akshay Sabale
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ती भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहे.
पश्चिम बंगालच्या हुगळी मतदारसंघातून भाजपनं पुन्हा एकदा खासदार लॉकेट चॅटर्जी यांना उमेदवारी दिली आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बंगाली सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अभिनेत्री हेमा मालिनी यांना भाजपनं पुन्हा एका मथुरेतून तिकीट दिलं आहे. तिसऱ्यांदा भाजपनं हेमा मालिनी यांना उमेदवारी दिली आहे.
तृणमूल काँग्रेसनं हुगळी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री रचना बॅनर्जी यांना उमेदवारी दिली आहे. रचना बॅनर्जी खासदार आणि लॉकेट चॅटर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आहेत.
तृणमूल काँग्रेसनं आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट दिलं आहे. सिन्हा यांनी 1992 मध्ये दिल्ली पोटनिवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली.
रामायण मालिकेतून श्री प्रभू राम यांची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल यांना भाजपनं मेरठमधून तिकीट दिलं आहे.
भोजपुरी सिनेमातील लोकप्रिय चेहरा, अभिनेते आणि गायक मनोज तिवारी यांना भाजपनं ईशान्य दिल्लीतून तिकीट दिलं आहे. सध्या याच मतदारसंघातून ते विद्यमान खासदार आहेत.
बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमातील अभिनेते रवी किशन यांना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील गोरखपूर मतदारसंघातून भाजपनं तिकीट दिलं आहे. ते गोरखपूरमधून खासदारही आहेत.
R