Akshay Sabale
देशात पाचव्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत अभिनेते आणि अभिनेत्रींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
काही अभिनेत्रींना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यात सनी लिओनीपासून कतरिना कैफपर्यंत अभिनेत्रींचा समावेश आहे. त्याबद्दल जाणून घेऊया....
सनीन लिओनीचं खरं नाव करनजीत कौर आहे. तिच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. त्यामुळे तिला भारतात मतदान करता येत नाही.
आलिया भट्टकडे भारतीय नाहीतर ब्रिटिश नागरिकत्व आहे. आलियाचा जन्म लंडनमधील बर्मिंघममध्ये झाला आहे.
नोरा फतेहीला सुद्धा भारतात मतदान करण्याचा अधिकार नाही. नोराकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. तर, तिचे आई-वडील मोरक्कोमधील आहेत.
जॅकलिनचे वडील श्रीलंकेतील असून आई मलेशियाची आहे. तिचा जन्म बहरीनमध्ये झाला आहे. तर, जॅकलिनकडे श्रीलंकेचं नागरिकत्व आहे.
कतरिना कैफ ब्रिटिश नागरिक आहे. तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे ब्रिटिश उद्योगपती आहे.