Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis: शोभाताई, गोवाल,भगरे...नवख्या उमेदवारांनी दिग्गजांना लोळवलं!

Mangesh Mahale

धुळे:शोभा बच्छाव

राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी पराभव केला. बच्छाव यांनी 3831 मतांनी भामरे यांचा पराभव केला.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis | Sarkarnama

भिंवडी: बाळ्या मामा

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी धूळ चारली. 80 हजार मतांनी त्यांचा पराभव केला.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis | Sarkarnama

बीड: बजरंग सोनवणे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या या लढतीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा 6 हजार 555 मतांनी पराभव केला.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis | Sarkarnama

नगर दक्षिण:नीलेश लंके

लंके यांनी भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचा पराभव केला. चुरशीच्या लढतीत त्यांनी 28 हजार मतांनी विखेंचा पराभव केला.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis | Sarkarnama

अमरावती:बळवंत वानखेडे

काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांची लढत नवनीत राणा यांच्याशी झाली. नवनीत राणा यांना पराभूत करुन वानखेडे 19 हजार मतांनी निवडून आले.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis | Sarkarnama

जालना:कल्याण काळे

काँग्रेसचे कल्याण काळे यांनी पाचवेळा खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. दानवे यांचा त्यांनी तब्बल एक लाख मतांनी पराभव केला.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis

दिंडोरी: भास्कर भगरे

शरद पवारांचे शिलेदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना हरवलं. 1,13,199 मतांनी भगरे यांनी पवार यांना पराभवाची धूळ चारली.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis | Sarkarnama

चंद्रपूर : प्रतिभा धानोरकर

कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करून प्रतिभा धानोरकर या जायंट किलर ठरल्या. त्यांनी तब्बल अडीच लाख मतांनी मुनगंटीवारांना पराभूत केलं.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis | Sarkarnama

नंदूरबार : गोवाल पाडवी

दोन टर्म खासदार राहिलेल्या हिना गावित यांचा काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी 1 लाख 59 हजार 120 मतांनी पराभव केला आहे.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis | Sarkarnama

NEXT: संसदेत महाराष्ट्रातील स्त्रीशक्ती; 'या' आहेत सात महिला खासदार