Deepak Kulkarni
Maratha Reservation याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे विनोद पाटील यांनी जाहीर केले आहे.
आग्रा येथे साजरी केलेल्या सार्वजनिक शिवजयंतीनंतर शहरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सत्कार मेळावा ठेवला होता. यावेळी विनोद पाटील यांनी ही घोषणा केली.
लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप कोणत्याही पक्षाशी आमचं बोलणं झालेलं नाही.
जो योग्य वाटेल त्या पक्षाकडून आम्ही निवडणूक लढू किंवा समाज म्हटला तर अपक्षही लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई संपल्यावर निवडणूक लढवणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच बोललो होतो. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात सध्याच्या घडीला मराठा समाज एकवटलेला बघायला मिळतोय. त्यामुळे त्याचा फायदा कदाचित विनोद पाटील यांना होण्याची शक्यता आहे.
लोकांच्या आग्रहाखातर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं विनोद पाटील यांनी स्पष्ट केलं.
समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभेत जायचं आहे”, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली.