Akshay Sabale
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी मावळमधून उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दहावी पास बारणे अब्जाधीश आहेत.
गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 30 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीच बारणे दाम्पत्य अब्जपती होते. दोघांची मिळून एक अब्ज दोन कोटी 33 लाख 10 हजार 134 रुपयांची मालमत्ता होती.
2024 मध्ये ती एक अब्ज 31 कोटी 85 लाख 91 हजार 606 झाली आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षांत ती 30 कोटींनी वाढली आहे.
एकट्या बारणेंची एक अब्ज सहा कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 26 लाखांची, तर पत्नी सरिता यांच्याकडे 12 लाखांची रोकड आहे.
बारणेंकडे परदेशी बनावटीचे एक रिव्हॉल्वर आहे. त्यांच्याकडे साडेपंधरा कोटींची, तर पत्नीकडे एक कोटी 18 लाखांची जंगम मालमत्ता आहे.
त्यात बारणेंची हिरेजडीत अंगठीच साडेअकरा लाखांची आहे. त्यांच्याकडे अर्धा किलो, तर पत्नीकडे पाऊण किलो सोने आहे.
मर्सिडीज बेंजसह तीन आलिशान मोटारी आहेत. 85 लाख रुपयांचे कर्ज बारणेंवर आहे.